भुसावळात रश्मी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन : संस्थेच्या सामाजिक कार्याचा शुभारंभ :

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील गांधी नगर रिंग रोड येथे रश्मी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिक्षक केदार बारबोले यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी जे जे हॉस्पिटल मुंबई येथील एम डी.डॉ. ऋषिकेश पारधे होते.

कार्यक्रमास आर्या फाउंडेशनच्या डॉ वंदना वाघचौरे .असिस्टंट जनरल मॅनेजर जळगाव जनता सहकारी बँक बापू बोरसे व विस्तार अधिकारी ग्रामपंचायत भुसावळ गौतम वाढे, उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल आणि भारतीय संविधान देऊन स्वागत करण्यात आले. डीवायएसपी केदार बारबोले यांचे हस्ते संस्थेच्या कार्यालयाचे आणि फलकाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या नूतन अध्यक्षा सौ संगीता भामरे यांनी केले. त्यांनी संस्थेची उद्दिष्टे व कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर मांडली. सूत्रसंचालन बहारदार शैलीत प्रकाश लोडते यांनी केले.

उद्घाटन प्रसंगी डीवायएसपी केदार बारबोले यांनी संस्थेच्या कार्यास शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. तसेच बापू बोरसे, डॉ. वंदना वाघचौरे, सुमंगल आहेर व गौतम वाढे यांनीही आपले विचार मांडले.

या सोहळ्यास महिला बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,धम्मशील बुद्ध विहार गांधीनगर येथील महिला व मैत्री सागर महिला मंडळ, सरिता नन्नवरे, मितवा बहुउद्देशीय संस्था अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस, नारी शक्ती ग्रुप महिला मंडळ ,(कंडारी) सावित्रीबाई फुले महिला मंडळ, आदर्श विकास बचत गट ,(किन्ही) यासह विविध महिला मंडळे व सामाजिक संस्थांसह सुमंगल आहेर , सुनील निकम सौं मनीषा निकम, सुरेश सोनावणे स्वप्नील सूर्यवंशी, जयश्री इंगळे, सरिता ननावरे, शोभा इंगळे, राजेश्री सुरवाडे, शोभा सुरवाडे ,शर्मिला ,भारती , चंदा सोनावणे, इंगोले वपरिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र भामरे, सागर भामरे , सौ . रश्मी पारधे, सौ.सोनल भामरे , पवन भामरे ,लता भामरे, मालू नरवाडे,सुलोचना साबळे व संजना गोडघाटे यांचेसह रश्मी बहुउद्देशीय संस्था पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने सौ संगीता भामरे यांनी आभार प्रदर्शन केले. उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था भामरे परिवाराच्या वतीने करण्यात आली.