भुसावळ विभागात मुख्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून द्वैमासिक संरक्षा तपासणीचा आढावा


भुसावळ (प्रतिनिधी) –

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी मध्य रेल्वे प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी सी आर प्रसाद तसेच इतर मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम के मीना, विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भुसावळ ते अकोला दरम्यान द्वैमासिक संरक्षा तपासणी करण्यात आली.

किमी 555-556 येथील मुंड ब्रिजची तपासणी करण्यात आली. त्यानंतर लेवल क्रॉसिंग क्रमांक-38A फाटक व अकोला टीएसएस यांची तपासणी करण्यात आली. अकोला रेल्वे स्थानक परिसर, रिले रूम तसेच लोको लॉबीची पाहणी करण्यात आली.

अकोला ते शेगाव दरम्यान कर्वे क्रमांक 49 (शेगाव यार्ड), स्थानक परिसर व कामकाज स्थळाची तपासणी करण्यात आली.

बोदवड स्थानक व बंद असलेले लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 07 यांची पाहणी करण्यात आली. भुसावळ स्थानक येथे पॅसेंजर लॉबी, रनिंग रूम, एआरटी व सेल्फ प्रॉप्हेल्ड ॲक्सिडेंट रिलीफ मेडिकल व्हॅन यांची तपासणी करण्यात आली.

तसेच विभागीय कार्यालयात विभागीय रेल्वे व्यवस्थापक, श्री पुनीत अग्रवाल व शाखा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निरीक्षणातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या संपूर्ण सुरक्षा तपासणीद्वारे रेल्वे संरचना, प्रवासी सुविधा व कार्यपद्धतींचा आढावा घेऊन सुरक्षित, कार्यक्षम व दर्जेदार रेल्वे सेवा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.