पाचोरा बसस्थानकात सोन्याची पोत चोरली; चोरट्या महिलेला पोलिसांकडून तत्काळ अटक…!

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या घटनेचा पोलिसांनी तत्काळ छडा लावला असून एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.

भडगाव आसनखेडा येथील विवेकानंद कॉलनी परिसरातील रहिवासी जयश्री स्वप्नील पाटील (वय 22) या 15 एप्रिल 2026 रोजी परीक्षा देण्यासाठी पाचोरा येथे एम.एम.कॉलेजमध्ये आल्या होत्या. परीक्षा संपल्यानंतर दुपारच्या सुमारास त्या पाचोरा बसस्थानकावरून जळगावकडे जाणाऱ्या बसमध्ये बसल्या असता, त्यांच्या गळ्यातील सुमारे 3 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञाताने चोरली.
याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास सुरू करून गोपनीय माहितीच्या आधारे संगिता करण सोळुंखी (वय 42) या महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्याकडून एक सोन्याचा मणी व दोन डोरले असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, सहाय्यक फौजदार विलास पाटील, पोलीस हवालदार श्रीकांत गायकवाड तसेच इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्रीकांत गायकवाड करत आहेत