पोलिस दलाचा उपक्रम : मार्च महिन्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव :

उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन भुसावळ उपविभागाच्या ५ पोलिसांना केले सन्मानित

भुसावळ (प्रतिनिधी )- पोलिस दलाची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये कामाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी भुसावळ उपविभागात ‘पोलिस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ’ ही संकल्पना राबवली जात आहे. मार्च महिन्यात गुन्हे शोध, महिलांचा शोध आणि कायदा-सुव्यवस्थेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात विशेष गौरव करण्यात आला. यात पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ उपविभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांची निवड केली होती.

शहरातील तिन्ही पोलिस ठाणे, वाहतूक शाखा व विभागातील नशिराबाद येथील पोलिस ठाण्यात अंमलदार उपस्थित होते.

उत्कृष्ठ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दरमहा गौरव केला जातो. पुरस्कारासाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना रोख रक्कमेसह प्रमाणपत्र देऊन गौरव केला जातो. दर महिन्यात भुसावळ डीवायएसपी कार्यालयात होणाऱ्या क्राईम मिटिंगमध्ये या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येते. दरम्यान, पुरस्कारासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने केलेल्या कामाचे मूल्यमापन केले जाते. संबंधित पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाच्या मूल्यमापनाची नोंद ठेवतात. त्या आधारे हा प्रस्ताव तयार केला जातो. या कार्यक्रमाच्या वेळी डीवायएसपी केदार बोरबोले, पोलिस निरीक्षक उद्धव निरीक्षक राहुल वाघ, डमाळे, निरीक्षक महेश गायकवाड, सहायक नारखेडे वाहतूक निरीक्षक योगिता (नशिराबाद) आणि महाले यांच्यासह पोलिस शाखेचे सहायक निरीक्षक उमेश

पुरस्काराचे स्वरूप. निवड झालेल्या प्रत्येक

अंमलदाराला एक हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, या टॉप कॉपचे नाव आणि फोटो पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध केले जाणार आहेत. जेणेकरून इतर कर्मचाऱ्यांना त्यातून प्रेरणा मिळेल

गुन्हे शोध पथकांचाही गौरव केवळ टॉप कॉपच नव्हे, तर महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणणाऱ्या पथकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये बाजारपेठ पोलिस ठाण्यातील योगेश माळी, ज्यांनी अज्ञात वाहनाचा शोध लावला. नशिराबाद राजेश मेढे यांच्या पथकाने गावठी कट्ट्यासह पोलिस ठाण्यातील कमलाकर बागुल आणि फुटेजच्या आधारे चोरीचा माल हस्तगत पसार संशयिताला अटक केली. सीसीटीव्ही करणाऱ्या विजय नेरकर आणि त्यांच्या

यांना मिळाला ‘टॉप कॉप’चा मान

मार्च महिन्यासाठी उपविभागातील राहुल भोई (भुसावळ शहर) यांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील माल हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी. सहायक फौजदार चंद्रशेखर गाडगीळ (भुसावळ बाजारपेठ) यांनी सणउत्सव आणि निवडणुकांमध्ये वाहन चालक म्हणून उत्कृष्ट कर्तव्य पार पाडले. सुधीर विसपुते ऑपरेशन शोध अंतर्गत १७ पैकी (भुसावळ तालुका) यांनी १० बेपत्ता महिलांचा शोध लावला. गुणवंत देशमुखन (नशिराबाद) यांनी निकाली काढल्या. पोलिस लोकन्यायालयांतर्गत ३८ केसेस अधिकारी राहुल भंडारे (वाहतूक शाखा) यांनी अपहृत मुलीचा शोध, कायदा-