भुसावळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

भुसावळ (प्रतिनिधी) -: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथे डॉ बाबासाहेब यांचे चव छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना संजय सावकारे , प्रांत अधिकारी श्री. जितेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक श्री. केदार बारबोले, तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत समता, न्याय, बंधुता आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी त्यांनी दिलेला संघर्ष सदैव प्रेरणादायी असल्याचे सांगितले. समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या दूरदृष्टीची आजही गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात सामाजिक एकात्मतेचा संदेश देत उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प केला.