भुसावळ (प्रतिनिधी) – येथील पी एम. श्री. द. शि. विद्यालयात महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शांत व उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय मंदवाडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. समाजातील समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


