नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ आंबेडकर यांना आदरांजली:

जळगाव | प्रतिनिधी

नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी संस्थापक अध्यक्ष सौ. मनीषा पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्या भारतीय राज्यघटनेतील अमूल्य योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

या कार्यक्रमास सौ. मनीषा पाटील, आशा मौर्य, रेणुका हिंगू, हर्षा गुजराती, तेजल वनरा आदी उपस्थित होत्या.