भुसावळ (प्रतिनिधी ) – बहुप्रतिक्षित ‘बीसारा लेडीज इक्वालिटी रन’ या महिला धावस्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अधिकृत टी-शर्ट व आकर्षक पदकाचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमामुळे आगामी स्पर्धेबाबत शहरात उत्सुकता वाढली आहे.

अनावरण सोहळा प्रायोजक ‘माय फिटनेस जिम’चे संचालक प्रमोद धनगर, ‘रॉयल लॉन्स’चे संचालक डॉ. मेहफूझ अली, ‘कुकरेजा सुपर शॉपी’चे संचालक संजय कुकरेजा, नूतन फालक तसेच सहभागी धावपटू डॉ. सुवर्णा गाडेकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी संस्थेचे प्रमुख प्रवीण फालक, कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉ. निलिमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील, तसेच विश्वस्त ब्रिजेश लाहोटी, प्रवीण वारके आणि प्रवीण पाटील उपस्थित होते. स्वाती फालक, कीर्ती मोटळकर, गरिमा न्याती, सायली बेंडाळे यांसह अनेक महिला धावपटूंनीही उपस्थिती लावली.
स्पर्धेपूर्वी आयोजित १५ प्रशिक्षण सत्रांमध्ये नियमित सहभाग नोंदवणाऱ्या पुष्पा तिवारी, मनीषा सिंह, सारंग चौधरी आणि प्रवीण पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच बाल सहभागींचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वाती फालक, वर्षा वाडिले आणि सुयश न्याती यांचे सहकार्य लाभले.
ही धावस्पर्धा १२ एप्रिल २०२६ रोजी रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड, भुसावळ येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत ३, ५ आणि १० किलोमीटर असे विविध गट असून, ५ व १० किमी गटांना ‘टायमिंग रन’ म्हणून विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
महिलांमध्ये आरोग्य, फिटनेस, आत्मविश्वास आणि समानतेचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित ही स्पर्धा “Run for Equality, Run for Health” या संदेशासह भुसावळ शहरासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


