खबरदारी म्हणून बाजारपेठच्या ५२ पोलिसांचे स्वॅब तपासणी करीता रवाना ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिनांक २७ मे २०२० रोजी सहा.पोलीस उप निरीक्षक आनंदा गजरे यांचे निधन झाले होते. दरम्यान गजरे यांचा रिपोर्ट पोझेटिव्ह आल्याने बाजारपेठ पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. म्हणून खबरदारी घेण्याकरीता ३० मे शनिवार रोजी बाजारपेठच्या ५२ पोलिसांचे स्वॅब घेवून तपासणी करीता पाठविण्यात आले आहे .
बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची मनातील भीती काढण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण ५२ पोलिसांचे कोरोना विषाणूंचे स्वॅब घेऊन नमुने तपासणी कामी पाठविण्यात आले आहे.उर्वरित कर्मचाऱ्यांचे स्वॅब सोमवार रोजी घेण्यात येणार आहे.सदरची तपासणी नवोवदय जवाहर विद्यालयात दुपारी 2 वाजेला डॉ.घोषाल यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *