भोरगांव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे पोलीस उपनिरीक्षक उर्मिला पाटील यांचा सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भोरगांव लेवा पंचायत ठाया पाडळसे विभाग भुसावळ यांच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झालेल्या समाजभूषण कु. उर्मिला विलास पाटील (मूळगाव पाडळसे, हल्ली मुक्काम भुसावळ) यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम दि. ७ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी कुटुंबनायक ललित पाटील व विभागीय अध्यक्ष सुहास चौधरी उपस्थित होते. आरती चौधरी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन कु. उर्मिला पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात सुभाष भंगाळे यांनी कु. उर्मिला पाटील यांच्या शिक्षणापासून स्पर्धा परीक्षेपर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती उपस्थितांना दिली. आरती चौधरी यांनी उर्मिला पाटील यांचे अभिनंदन करत महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजाची मान उंचावणाऱ्या समाजातील मुलींच्या यशाचा गौरव होत असल्याचा अभिमान व्यक्त केला.

यावेळी चंद्रकांत चौधरी यांनी भावना व्यक्त करताना पोलीस सेवेत असणाऱ्या कष्टमय आयुष्याची जाणीव करून दिली.

या कार्यक्रमाला किरण चौधरी, महेश फालक, हरीष फालक, शरद फेगडे, अनिल वारके, आर. जी. चौधरी, अजय पाटील, भाग्यश्री पाचपांडे, अरुण चौधरी, धनंजय पाटील, परीक्षित बऱ्हाटे, जगदीश फिरके, नितीन बऱ्हाटे आदी मान्यवर उपस्थित होते.