भुसावळीत प्रतिष्ठा महिला मंडळाचा जागतिक महिला दिन सोहळा – ” स्त्रीशक्तीचा जयजयकार “

भुसावळ (प्रतिनिधी ) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळ, भुसावळ यांच्या वतीने रविवार, ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता बियाणी स्कूल, प्रोफेसर कॉलनी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात भारतीय इतिहासातील प्रेरणादायी महिला व्यक्तिमत्त्वांवर आधारित सजीव देखावे आणि सादरीकरण होणार आहे. यात राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, आणि कल्पना चावला यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सादर करण्यात येणार असून स्त्रीशक्तीची अमर गाथा प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे.

कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ चेही आयोजन करण्यात आले असून त्यात ३ पैठणी साड्या आणि २ चांदीची नाणी देण्यात येणार आहेत. याशिवाय फूड स्टॉल तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनी संजय सावकारे यांनी केले आहे.