शहर भगवेमय; विविध भागातून सात मिरवणुका, शिवप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

भुसावळ (प्रतिनिधी )
शिवजयंती निमित्त भुसावळ शहरात मोठ्या उत्साहाने उत्सवास प्रारंभ करण्यात आला या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री मशाल रॅली काढून शिवआरती करण्यात येऊन आतषबाजी करीत जल्लोश साजरा करण्यात आला. तसेच शुक्रवारी सकाळी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली . शिवशहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसर भगव्या पताका आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आला. विशेषतः भुसावळ रेल्वे स्थानक परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक सजावट करण्यात आली आहे
शिवजयंती उत्सवाला गुरुवारी रात्री मशाल रॅलीने प्रारंभ झाला. सातपुड्यातील मनुदेवी मंदिर येथून विशाल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मशाल रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली चिंचोली, किनगाव, यावल मार्गे रात्री सुमारे ९ वाजता भुसावळ शहरात दाखल झाली. त्यानंतर जळगाव नाका, नाहाटा चौक, अष्टभुजा चौक व जामा मशीद मार्गे ही रॅली स्टेशन रोडवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. मध्यरात्री १२ वाजता येथे पुतळा पूजन व आरती करण्यात आली.

प्रसंगी नगराध्यक्षा सौ गायत्री ताई भंगाळे व समर्थक तसेच नगरसेवक पिंटूभाऊ कोठारी व मान्यवर नागरिक शिवप्रेमी उपस्थित होते.

दुचाकी रॅलीने वेधले लक्ष
दरम्यान, शुक्रवारी सकाळी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. मिलिंद कापडे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली बाजारपेठ येथून सुरू होऊन दगडी पुलाखालून मामाजी टॉकीज, सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, तहसील कार्यालय, गांधी पुतळा, शहर पोलिस ठाणे, पाणीगेट व लोखंडी पुलाखालून मार्गक्रमण करत अखेरीस शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप झाला. रॅलीत शंभू राजे मित्र मंडळ यांचेसह शिवजयंती उत्सव समिती पदाधिकारी कार्यकर्ते, यांचेसह शिवप्रेमी नागिरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या दुचाकी रॅलीत शिवजयंती उत्सव समिती, शिवप्रेमी तसेच शंभूराजे मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



