मुक्ताईनगर ( प्रतिनिधी )-
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरू असताना मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची गुरुवारी अचानक तब्येत खालावली. अधिवेशनादरम्यान कामकाज सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच डॉ. श्रीकांत शिंदे तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन आमदार पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आमदार पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिली असून डॉक्टरांकडून आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात येत आहेत.


