भुसावळ तालुक्यात तांड्यावर रंगली होळी ; ना संजय सावकारे यांनी आदिवासी बांधवासोबत धरला ठेका:

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील तांड्यावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी जनजाती बांधव व ग्रामस्थांसमवेत पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी केली.

तालुक्यातील मांडवे दिगर भिलमडी ,मुसळ तांडा येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री सावकारे यांनी ग्रामस्थांसोबत होळी व धुळवड साजरी केली. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांसमवेत पारंपरिक नृत्याच्या ठेक्यावर ताल धरत सणाचा आनंद लुटला.

मंत्र्यांच्या उपस्थितीमुळे तांड्यावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत करत सणाचा आनंद द्विगुणित केला. या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.