भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील प्रभाग क्रमांक १८ च्या नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी गंगाराम प्लॉट, गौतम नगर, भवानी पेठ व कोलते गल्ली परीसरातील सुमारे ८०० कुटुंबांना रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक औषधांचे नुकतेच वाटप केले.
तीन दिवस पुरतील असा डोस केला वितरीत
आर्सोनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक औषधाला आयुष मंत्रालय भारत सरकारने अधिकृत मान्यता दिलेली आहे. अशा रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्या कोरोना विषाणूचा संक्रमणापासून बचाव करता येतो. प्रत्येक कुटूंबातील प्रत्येक सदस्याला किमान तीन दिवस पुरतील, या पध्दतीने या गोळ्यांचे वितरण करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी सांगितले .



