भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील एका ५० वर्षीय व्यापाऱ्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना आज दि.२२ मे शुक्रवार रोजी दुपारी शहरातील सिंधी काॅलनी शेजारील लेंडीपुरा भागात घडली. यामुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , सिंधी काॅलनी जवळील लेंडीपुरा भागात राजकुमार आगीचा या सिंधी व्यापाऱ्याकडे दिनदयाल नगरातील एक गुन्हेगार तरुण येऊन त्याने काहीतरी वस्तू घेतल्यानंतर पैशांच्या कारणावरून त्याने राजकुमार आगीचा यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना ५ वाजेच्या सुमारास येथे घडली.या हल्ल्यात पंकज रोडा हा व्यक्ती सुध्दा जखमी झाला.पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना खेडी येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ रवाना केले.



