भुसावळ येथे २८रोजी सकल हिंदू संमेलनाचे आयोजन :

भुसावळ प्रतिनिधी
“जन्मापेक्षा कर्म श्रेष्ठ” या तत्त्वावर आधारित समस्त सनातन हिंदू समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी भुसावळ येथील ब्राह्मण संघ यांच्या वतीने सकल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे संमेलन आज रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ब्राह्मण संघ, न्यू एरिया वॉर्ड, भुसावळ येथे होणार आहे.
सद्यस्थितीत हिंदू समाजामध्ये आरक्षण या विषयामुळे निर्माण झालेले मतभेद संवाद व चर्चेच्या माध्यमातून दूर करणे, समाजातील एकता व अखंडता अबाधित ठेवणे, तसेच धर्मरक्षण, सामाजिक-सांस्कृतिक आणि वैचारिक देवाण-घेवाण वृद्धिंगत करणे, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे .
या संमेलनासाठी सनातन हिंदू धर्मातील बारा बलुतेदार, अठरा पगड जाती तसेच विविध शाखा-पोटशाखांतील समाज घटकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक समाजाने आपले अध्यक्ष, सचिव किंवा किमान दोन प्रतिनिधी उपस्थित राहून चर्चा स्वरूपात आपले विचार मांडावेत, अशी विनंती ब्राह्मण संघाकडून करण्यात आली आहे.
कार्यक्रमात सकाळी ८ ते १० : श्री गायत्री दीप यज्ञ , सकाळी १० ते १२ : सकल हिंदू संमेलन
दुपारी १२ वाजता : महाआरती व प्रसाद भोजन या प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे .
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ब्राह्मण संघ, भुसावळ यांच्या समस्त कार्यकारी मंडळाच्या वतीने संघाचे अध्यक्ष गणेश हरीभाऊ वढवेकर , सचिव महेंद्र लक्ष्मण गोडबोले, कोषाध्यक्ष आमोद वासुदेव टेंभुर्णीकर यांनी केले आहे.