निंभोरा (दीपनगर) : भुसावळ तालुक्यातील दीपनगरजवळ असलेल्या निंभोरा बुद्रुक येथे भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा जळगाव पूर्व यांच्या वतीने जिल्हा स्तरीय महिला धम्म मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास प्रा. अंजलीताई आंबेडकर या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सदर मेळावा सात ते दहा दिवसीय उपासिका शिबिर व एकदिवसीय समता सैनिक दल शिबिराच्या समारोपानिमित्त दि. २६ डिसेंबर २०२५ (शुक्रवार) रोजी त्रिरत्न बुद्ध विहार, निंभोरा येथे संपन्न होणार आहे.
या मेळाव्याच्या महिला अध्यक्षपदी प्रियंका अहिरे असून स्वागत अध्यक्ष म्हणून सुमंगल तथा रविंद्र अहिरे कार्य पाहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार व जिल्हा सचिव सुशीलकुमार हिवाळे करणार आहेत.
मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून राज्य संघटक लता तायडे, राज्य सचिव (प्रचार व पर्यटन) के. वाय. सुरवाडे, लेफ्ट कर्नल मीना झिने, लेफ्ट कर्नल रमेश साळवे तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगाव पूर्वची पुरुष व महिला कार्यकारिणी उपस्थित राहणार आहे.
या प्रसंगी सर्व तालुका, शहर, गाव व वॉर्ड स्तरावरील कार्यकारिणी सदस्य, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, समता सैनिक दलाचे सदस्य, शिबिरार्थी महिला तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित राहणार आहेत.
या महिला धम्म मेळाव्यास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा जळगाव पूर्व यांच्या वतीने महिला सरचिटणीस वैशाली सरदार व सुशीलकुमार हिवाळे यांनी केले आहे.


