राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भुसावळच्या सुशांतची निवड :

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची ज्युनियर राज्य अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा नुकतीच नंदुरबार येथे ५ ते ७ डिसेंबर दरम्यान संपन्न झाली, या स्पर्धेतून केंद्रीय विद्यालय वरणगाव येथील इयत्ता सातवी चा विद्यार्थी सुशांत प्रीतम सोनवणे याची आग्रा (उत्तर प्रदेश) येथे भारतीय टेनिस बॉल फेडरेशन च्या मान्यतेने उत्तर प्रदेश टेनिस बॉल क्रिकेट संघटना आयोजित ३३ व्या ज्युनिअर नॅशनल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे पदा १९ ते २२ डिसेंबर दरम्यान होणार असून .स्पर्धेत विजेत्या संघाला ५१ हजाराचे रोख बक्षीस देण्यात येणार असून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण युट्युब वर होणार आहे. संघटनेला मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स गव्हर्मेंट ऑफ इंडिया ची तसेच स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता आहे. या निवडीबद्दल सुशांतचे छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे सचिव वासेफ पटेल यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.