भुसावळ कनिष्ठ महाविद्यालयाला स्कॉफ तर्फे मूल्यांकनात अ दर्जा प्राप्त :

भुसावळ (प्रतिनिधी ) -येथील नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयाचे स्कॉफ(SQAAF) School Quality Assessment &Assurance Framework समितीतर्फे नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयाची संपूर्ण तपासणी करण्यात आली या समितीचे समिती प्रमुख सुनील मोरे (केंद्रप्रमुख साकेगाव) तर सदस्य म्हणून विजय देवरे सर, अजय चालसे, राहुल पाटील सर यांचा यात समावेश होता या समितीने संपूर्ण दिवसभरात महाविद्यालयाची अंतर्गत आणि बहिर्गत अशी तपासणी केली यात संपूर्ण महाविद्यालयाचे त्यांनी अंतर्गत व बाह्य मूल्यमापन अत्यंत निरपेक्ष वृत्तीने तसेच प्रामाणिकपणे पूर्ण केले.त्यांनी आपल्या मूल्यमापनात प्रामुख्याने ग्रंथालय,लिपिक कार्यालय,संगणक लॅब,विज्ञान लॅब, आयटी लॅब, प्राचार्य व उपप्राचार्य कार्यालय, जिमखाना विभाग,संगणक कक्ष,स्वच्छतागृह आदी बाबींचे सखोल निरीक्षण व परीक्षण केले यावेळी महाविद्यालयाच्या स्कॉफ समितीचे प्रमुख डॉ.श्यामकुमार दुसाने,प्रा.सौ एन वाय पाटील मॅडम, प्रा.अमोल पालवे यांनी संपूर्ण महाविद्यालयाची विविध विभागानुसार माहिती त्यांनी समितीला दिली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन फालक,चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी,कोषाध्यक्ष संजयकुमारजी नाहाटा तसेच संपूर्ण संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे,उपप्राचार्य डॉ.दीपक पाटील उपप्राचार्य डॉ.जी आर वाणी,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील,पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील,कार्यालयीन अधिक्षक श्री भगवान तायडे,श्री अतुल किनगे,श्री मिलिंद फेगडे,श्री मुकेश फिरके,क्षेत्र चेअरमन प्रा.एल पी टाक, प्रा.एच बी राजपूत,प्रा.एम एच सरोदे,प्रा.सौ एस के चौधरी,प्रा.सौ अर्चना सपकाळे, प्रा.सौ सुरेखा भोळे व क्षेत्र समिती सदस्य यांच्याशी विस्तृत चर्चा केली आणि सर्व चर्चेअंती त्यांनी नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयास “अ”दर्जा(A Grade)प्रदान करण्यात आल्याचे सुचित केले