महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून १३ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध :


महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित असल्याने मध्य रेल्वेने प्रवाशांची सुरक्षितता आणि स्थानकांवरील गर्दी नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने ५ डिसेंबर २०२५ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ आणि नागपूर विभागातील एकूण १३ प्रमुख स्थानकांवर हे निर्बंध लागू राहणार आहेत.

कोणत्या स्थानकांवर निर्बंध लागू?

मुंबई विभाग

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)
  • दादर

निर्बंध कालावधी: ०५.१२.२०२५ ते ०७.१२.२०२५

भुसावळ विभाग

  • भुसावळ
  • नाशिक रोड
  • मनमाड
  • जळगाव
  • अकोला
  • शेगाव
  • पाचोरा
  • बडनेरा
  • मलकापूर
  • चाळीसगाव

निर्बंध कालावधी: ०५.१२.२०२५ व ०६.१२.२०२५

नागपूर विभाग

  • नागपूर

निर्बंध कालावधी: ०५.१२.२०२५ व ०६.१२.२०२५

अपवाद

वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, बालक, निरक्षर प्रवासी तसेच एकट्याने प्रवास करू न शकणाऱ्या महिला प्रवाशांसोबत असलेल्या व्यक्तींना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

उद्देश

या उपाययोजनेचा मुख्य हेतू म्हणजे प्लॅटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी टाळणे, प्रवाशांची हालचाल सुरळीत ठेवणे आणि स्टेशन परिसरात सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे.मध्य रेल्वेने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

.