भुसावळ (प्रतिनिधी ) -: येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे दि.३ ते ७ जानेवारी २०२६ दरम्या न भुसावळ ते श्री क्षेत्र शेगाव पायी वारीचे आयाेजन केले आहे.भाविकांना पायीवारीत सहभागी व्हायचे असेल त्यांनी १ जानेवारी २०२६ पर्यंत संपर्क करावा असे आवाहन मंदिर विश्वस्तांनी केले आहे.
पालखी मार्गक्रम असा

३ जानेवारी राेजी सकाळी ६ वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर भुसावळ येथुन पालखी शेगांवकडे प्रस्थान करीत संध्याकाळी मुक्ताईनगर येथे मुक्काम करेल. ४ राेजी मुक्ताईनगर ते मलकापूर, ५ राेजी मलकापूर ते नांदुरा, ६ राेजी नांदुरा ते शेगाव मंगल कार्यालय व ७ जानेवारी राेजी शेगाव मंगल कार्यालय ते श्री क्षेत्र शेगाव मंदिरात गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे
तरी ज्या भाविकांना पायीवारीत सहभागी व्हायचे असेल त्यांनी अशाेक ठाकूर, विजय साेनार, जिवन ठाकूर, सागर वाणी, विनाेद तांबट, रवींद्र तळेले, जितेंद्र पाटील, सतीश भारंबे, शिवाजी सपकाळ व विनायक काेल्हे या सेवेक-यांशी दि.१ जानेवारी २०२६ पर्यंत संपर्क करावा, असे आवाहन मंदिर विश्वस्तांनी केले आहे.


