भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगर पालिका निवडणुकीत आज मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक मनोज बियाणी यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी त्यांच्या समवेत डॉ. संगीता बियाणी, कांताबाई बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, रोनक बियाणी, पियुष बियाणी आणि आयुशी बियाणी यांनीही मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला.
मतदानानंतर मनोज बियाणी यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आणि सुयोग्य प्रशासनासाठी मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले.


