भुसावळ नगरपरिषद निवडणूक 2025 : सकाळी 11.30 वाजेपर्यंत 16.57% मतदान

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपरिषद निवडणुकीसाठी आज, मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 16.57 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून मतदान केंद्रांवर मध्यम प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.

निवडणुकीतील दर दोन तासांची मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे:
वेळ : सकाळी 7.30 ते 9.30

स्त्री मतदार: 3,913

पुरुष मतदार: 5,249

तृतीयपंथी मतदार: 0

एकूण मतदान: 9,162

एकूण मतदान टक्केवारी: 5.12%

वेळ : सकाळी 7.30 ते 11.30

स्त्री मतदार: 16,043

पुरुष मतदार: 13,576

तृतीयपंथी मतदार: 1

एकूण मतदान: 29,620

एकूण मतदान टक्केवारी: 16.57%

पहिल्या दोन तासांत मंद गतीने सुरू झालेला मतदानाचा वेग हळूहळू वाढताना दिसत आहे. दुपारी आणि संध्याकाळी मतदारांची उपस्थिती आणखी वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मतदारांनी शांततेत व सुव्यवस्थित पद्धतीने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.