भुसावळ ( प्रतिनिधी ) मंगळवारी नगरपालिका निवडणुकीत छायाचित्रांसह मतदार व पत्र नसले तरी मतदान करता येणार आहे कारण भारत निवडणूक आयोगाने मतदार पटवण्यासाठी एकूण 12 पर्याय ओळखपत्रे मान्य केले आहेत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे त्यांनी ते मतदान केंद्रावर सादर करणे बंधनकारक आहे मात्र ओळखपत्र हरवले असेल ऐनवेळी मिळाले नसेल किंवा सोबत नसेल तर पर्यायी कागदपत्र पैकी कोणताही एक पुरावा दाखवून मतदान करता येईल मतदानासाठी मान्य असलेल्या बारा ओळखपत्र मध्ये अनुक्रमे आधार कार्ड मनरेगा अंतर्गत निर्मित रोजगार ओळखपत्र बँक किंवा टपाल विभागाने दिलेले छायाचित्रासह पासबुक कामगार मंत्रालया द्वारे वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड महान चालू परवाना पॅन कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड पार पत्र पासपोर्ट निवृत्तीवेतनाची दस्तावेज केंद्र राज्य शासन सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी दिलेले छायाचित्र ओळखपत्र संसद विधानसभा विधान परिषद सदस्यांना देण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र सामाजिक न्याय सशक्तीकरण मंत्रालय दिव्यांगांना दिलेले विशेष ओळखपत्र अनिमासी भारतीय मतदारांना ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट यांचा समावेश आहे यापैकी एक पुरावा मतदानावेळी ग्राह्य धरला जाईल



