शिवसेना शहर प्रमुख बबलू ब-हाटे यांनी स्वखर्चाने प्रभाग १० मध्ये केली फवारणी व नागरिकांची तपासणी

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस जास्त फ़ैलावत आहे . यासाठी खबरदारी व उपाय म्हणून
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनी येथील शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू ब-हाटे यांनी स्वखर्चाने सामाजिक दायित्व म्हणून प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांची तपासणी केली आहे . तसेच याच प्रभागातिल
विठ्ठल मंदिर व राम मंदिर वार्ड परिसरात गल्लोगल्ली ट्रॅकटरव्दारे सायंकाळी निरजंतुकीकरण (सॅनिटायझर ) करण्याकरीता फवारणी केली.
दरम्यान बबलू ब-हाटे यांनी स्वत: नॉन कॉन्टॅक्ट थर्मोमिटरने नागरिकांची तपासणी केली. दरम्यान रेशन दुकानात रेशनधारक नागरिकांची तपासणी करून प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या सूचना देवून जनजागृती केली . यावेळी बबलू ब-हाटे व शिवसैनिक यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *