भुसावळ (प्रतिनिधी )-
दिनांक 1 मे
महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात सोशल डिस्टन्स ची संपूर्ण काळजी घेऊन समस्त ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सोळा हजार 51 रुपयाचे बक्षीस घोषित करण्यात आले
बक्षिसाच्या रकमेत पैकी 11000 रुपये रोख बक्षीस ग्रामपंचायत प्रशासनातर्फे दिले जातील असे सरपंच अनिल पाटील यांनी घोषित केले तसेच माजी सरपंच आनंद ठाकरे यांच्याकडून 5051 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल येईल अशी घोषणा त्यांनी केली असे मिळून एकूण सोळा हजार 51 रुपये रोख बक्षीस व ट्रॉफी वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यास पुढील वर्षी 1 मे रोजी सत्कार समारंभ आयोजित करून प्रदान करण्यात येईल यासाठी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव पारित करण्यात येईल येईल असे सरपंच पाटील यांनी स्पष्ट केले या घोषणेने समस्त ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांमध्ये चैतन्य व उत्सवाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले प्रसंगी सर्वत्र कोरोना विषाणूने कहर केला असता साकेगाव ग्रामपंचायत कर्मचारी निष्ठेने गावात कार्यरत असून गाव कोरणा मुक्त राहण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा छोटेखानी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात संपन्न झाला त्याठिकाणी सरपंच अनिल पाटील माजी सरपंच आनंद ठाकरे ग्राम विकास अधिकारी गौतम वाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कर्मचारी वर्गाला येणारा रॉयल्टी मधून बोनस वाटप केले जाईल असे आश्वासन कर्मचाऱ्यांना देण्यात आले श्री ठाकरे यांच्याकडून चॉकलेट वाटप करण्यात आल्या प्रसंगी कर्मचारी वर्गाचा उत्साह दांडगा झाल्याचे दिसून आले त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील माजी सरपंच सुरेश पाटील ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील सुभाष कोळी अनिल सोनवाल राजेंद्र बाबुराव पाटील सह सर्व कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती आभार प्रदर्शन ग्रामपंचायत कर्मचारी रमजान पटेल यांनी केले
कर्मचार्यांचा उत्साह वाढवण्या करीता बक्षीस घोषित- माजी सरपंच
साकेगाव ग्रामपंचायत जिल्ह्यातील एकमेव पायलेट प्रोजेक्ट ग्रामपंचायत असून त्यासाठी सरपंच कमिटी सह कर्मचारी वर्गाने कठोर परिश्रम घेतले असून पुढील उद्देश गावाचे नाव राज्यस्तरावर व देशपातळीवर लौकिक व्हावे असून त्यासाठी कर्मचारी वर्गाचा उत्साह वाढावा अशा उदात्त हेतूने सरपंच अनिल पाटील व माजी सरपंच आनंद ठाकरे यांनी
बक्षीस घोषित केलेले आहे .



