ब्राह्मण संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील ब्राह्मण संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेचे रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक ३.०० वा. संस्थेच्या स्वा. सावरकर सभागृहात आयोजन करण्यात आले आहे .
मागील विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे.
ब्राह्मण संघाच्या घटनेमध्ये आवश्यक ते बदल घटना समितीद्वारा करून झाले आहेत, ते आजच्या सभेपुढे मांडून त्यावर विचार विनिमय करून त्यास सभेची मंजुरी घेणे. आणि त्यानंतर मा. धर्मदाय आयुक्त यांचेकडून ती नवीन घटना मंजूर करून घेणे. ब्राह्मण संघाच्या वास्तुचे नुतनीकरण करून संपूर्ण नवीन बांधकाम करणेसाठी, निधि संकलन आणि विविध सरकारी परवानगीसाठी लागणारे खर्च मंजूर करणे व त्यासाठीचे अधिकार संस्थेचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांना देणे यावर सभेत विचार विनिमय करून त्यास सभेची मंजुरी देणेबाबत.
ब्राह्मण संघाच्या नूतन वास्तुचे बांधकामासाठी, आर्किटेक्चर, इंजिनियर यांची नियुक्ती करणेसाठी निविदा प्रक्रिया राबविणेसाठीचे अधिकार ब्राह्मण संघाचे कार्यकारिणीस देणे हे सभेसाठी विषय राहणार आहे . सभासदा व्यतीरिक्त कोणत्याही व्यक्तीस सभागृहात उपस्थित राहता येणार नाही. प्रतिनिधीस परवानगी नाही.
ब्राह्मण संघाच्या सर्व सभासदांचे ओळख-पत्र बनवण्याचे काम सुरू असून सभासदाचा नूतन पत्ता असलेला लेखी अर्ज, फोटो, स्वसाक्षांकित आधारची झेरॉक्स व कायम स्वरूपी व्हॉटस्अॅप क्रमांक ब्राह्मण संघ कार्यालयात दि. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावेत. व सभेत उपस्थित राहण्याचे असे आवाहन
गणेश हरीभाऊ वढवेकर अध्यक्ष, व महेंद्र लक्ष्मण गोडबोले सचिव, ब्राह्मण संघ व कार्यकारीणीने केले आहे .