भुसावळात अमृत स्वयंरोजगार प्रमाणपत्र मेळाव्याचे आयोजन

भुसावळ ( प्रातिनिधी ) –
महाराष्ट्र शासनाच्या अमृत स्वयंरोजगार, प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि लघुद्योजक निर्मिती कार्यक्रम अंतर्गत योजेनेत लागणाऱ्या प्रमाणपत्रा बाबत मेळाव्याचे आयोजन ब्राम्हण संघातर्फे करण्यात आले आहे .
डोमिसाईल ,इनकम सर्टिफिकेट , EWS चे प्रमाणपत्र (राज्य शासनाच्या अंतर्गत, 4) EWS चे प्रमाणपत्र ( केंद्र शासनाचे )ही चारही प्रमाणपत्र अमृत योजने चा लाभ घेण्यासाठी लागणार आहे.
व्यक्तिगत स्तरावर यासाठी वेळ आणि खर्च जास्त प्रमाणात लागेल. म्हणून आपण अमृत योजेनेचे पदाधिकारी व ब्राह्मण संघ भुसावळ च्या संयुक्त विद्यामाने सर्व लघुउद्योजकांचा मेळावा आयोजित करीत आहोत.
सदर मेळाव्यात वरील प्रमाणपत्र योग्य दरात आणि कमी वेळात आपणास उपलब्ध करून मिळेल. तरी आपणास विनंती की ओपन कॅटेगरी मधील म्हणजे खुल्या प्रवर्गातील ( ब्राह्मण, वाणी, राजपूत, कम्मा, कायस्थ, नायर, अय्यंगार नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, यालमार, मारवाडी, ठाकूर, त्यागी, सेंगुथर, गुजराती, जाट, सिंधी, कानबी,, राजपुरोहित, कोमटी, आर्यवैश्य या सर्व खुल्या प्रवर्गातील बंधू – भगिनींना देखील या मेळाव्यात आमंत्रण आहे. तरी आपणा सर्वांना विनंती की व्यक्तीगत स्तरावर या बद्दल संबंधित व्यक्तींना माहिती देऊन अमृत योजनेचा लाभ घेण्यासाठी उपस्थीत राहावे.
हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खलील कागदपत्र सोबत आणावी. 1)स्वतः चा जन्म दाखला 2) 10 वीची मार्कशीट 3)अर्जदाराचे लिव्हिंग सर्टिफिकेट 4) अर्जदाराच्या वडिलांचे लिव्हिंग सर्टिफिकेट, 5) वडील हयात नसल्यास मृत्यूचा दाखला 6) अर्जदाराचे आधारकार्ड दोन सत्यप्रत 7) दोन पासपोर्ट फोटो 8 ) रेशन कार्ड 8) EWS साठी अर्जदाराच्या आजोबांचे लिव्हिंग किंवा मृत्यू दाखला इत्यादी कागदपत्र व एका प्रमाणपत्रा साठी 250 रुपये प्रति असे एकूण एक हजार रुपये खर्च लागणार आहे.
ज्यांना या खर्चा बाबत शंका असल्यास त्यांनी चौकशी करावी किंवा व्यक्तीगत स्तरावर प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावी. वरील खर्च हा सामूहिक स्तरावर करणार असल्याने शासकीय फी व सदर काम करणाऱ्या प्रतिनिधीचा आहे. तरी सर्वाना विनंती की अमृत योजनेचे भांडवली कर्ज, व कर्जा वरील व्याज परतावा या तसेच विविध उद्योगांच्या प्रशिक्षण योजनानां चा लाभ घेण्यासाठी व अधिक माहिती साठी दिनांक 09 नोव्हेंबर 2025 रविवार रोजी दुपारी चार वाजता ब्राह्मण संघ भुसावळ च्या कार्यालयात वरील कागद पत्र व शुल्क घेऊन उपस्थित राहवे. या वेळी अमृत योजनेचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. कार्यक्रमा नंतर आल्पोपहाराची व्यवस्था असून सर्व समाज बंधू – भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .