मुंबई : राज्यातील 6TFCFFग वाजला असून राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करीत असतानाच आदर्श आचारसंहिता जारी केली आहे.राज्यातील 246 नगरपालिकांसह 42 नगरपंचायतीत 2 डिसेंबरला मतदान होणार असून दुसर्या दिवशी 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

असे आहे वेळापत्रक
नामनिर्देशन पत्र- 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत- 17 नोव्हेंबर
छाननी- 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख- 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप- 26 नोव्हेेंबर
मतदा- 2 डिसेंबर
निकाल- 3 डिसेंबर
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण एक कोटी सात लाख तीन हजार 576 मतदार असतील त्यासाठी राज्यात एकूण 13 हजार कन्ट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.
विभागनिहाय नगरपरिषद-नगरपंचायती निवडणूक
कोकण- 17
नाशिक- 49
पुणे- 60
संभाजीनगर- 52
अमरावती- 45
नागपूर- 55
उमेदवारांच्या खर्चात वाढ
यंदा नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक लढवणार्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार अ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी 15 लाखांची मर्यादा तर क वर्ग नगरपालिकांसाठी सात लाखांची खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे.
मतदारांच्या सोयीसाठी नवीन अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. दुबार मतदानासंदर्भात योग्य खबरदारी घेतली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या पुढे डबल स्टारचे चिन्ह दाखवण्यात आले आहे. ज्या मतदारांच्या पुढे डबल स्टार असेल त्याच्याकडून दुसरीकडे मतदान करणार नाही असे डिक्लरेशन घेतलं जाईल.


