भुसावळात शहराच्या विकासासाठी शिवसेना ठाकरे गट निवडणूक मैदानात ! निष्ठावंतांची बैठक संपन्न .


भुसावळ (प्रतिनिधी ) – निवडणूक आयोगाने न.पा.निवडणूक घोषित केली या पार्श्वभूमीवर.शिवसेना ठाकरे गटांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक आयोजित केली.या बैठकीत शिवसेनेने नगराध्यक्ष, आणि संपूर्ण ५० प्रभाग लढवण्याची तयारी दर्शवली.तसेच राज्यातील आघाडी परिस्थिती, तसेच पक्षाचे वरिष्ठांचे आदेशानुसार भूमिका निश्चित केली जाईलअसेही यावेळी ठरविण्यात आले त्याचप्रमाणे पक्षाचा मेळावा दि.१० नोव्हेंबरला घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांना संधी

भुसावळात शहराच्या विकासासाठी शिवसेना ठाकरे गट निवडणूक मैदानात उतरले असून शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने निवडणूक लढवीत आहे यासाठी इच्छुक उमेदवारांना संधी .देण्यात आली असून शिवसेना संपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज उपलब्ध आहे. यासाठी इच्छुकांनी शिवसेना संपर्क कार्यालयात समक्ष भेटावे. असे आवाहन केले आहे .

या बैठकीत शिवसेनेचे चंद्रकांत शर्मा, मुकेश गुंजाळ , ललित मुथा दिलीप सुरवाडे, राजू इंगळे , बाळू भोई , राकेश खरारे , अरुण साळुंखे , गणेश चौधरी , शैख मकबूल , मनोज पवार , मेहमूद शैख जावेद हाजी , करण खरारे, हेमंत खंबायत, मिलिंद कापड़े, शरद जैसवाल , अमोल भालेराव , लव झाडगे , प्रशांत ठाकुर उमाकांत शर्मा (नमा) यांचेसह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.