हातभट्टीधारकांच्या तंबूत घबराट ; खंडाळा येथे डीवायएसपी यांची धडक कारवाई ; एक लाख 33 हज़ार 450 रूपयांच्या मुद्देमालासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना संसर्गाचा प्रादुभाव रोखण्याकरीता संपूर्ण भारतात लॉक डाऊन सुरु आहे . यामुळे अवैध दारू बनवीने विक्री करने बंद आहे याचा गैरफ़ायदा घेवून अवैध हातभटटी चालक यांचे फावले असून चोरीछुपे दारू बनविन्याचे काम सुरु आहे . मात्र
या अवैधधंदे चालकां व हातभट्टीधारकांच्या
विरुद्ध उपविभागीय पोलिस अधिक्षक गजानन राठोड यांनी धडक कारवाई सुरु केली आहे .पोलिसांच्या सततच्या कार्रवाइने अवैध हातभट्टीधारकांच्या तंबूत घबराट निर्माण झाली असून त्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे . तालुक्यातील खंडाळा येथे डिवायएसपी राठोड यांनी स्वत:
२२ एप्रिल गुरुवार रोजी स्वत: कारवाई करून २० ड्रमात
३८०० लिटर रसायन व गावठी हातभट्टीची दारूसह एकूण एक लाख 33 हज़ार 450 रूपयांच्या मुद्देमाल जप्त ; दोघां विरुद्ध कारवाई केली आहे .
भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा शिवारात नाल्याजवळ सार्वजनिक जागी ९ वाजेचे सुमारास संशयीत आरोपी इस्माईल छट्टू गवळी रा शिवपूर कन्हाळा हा गुळ ,महू नवसागर मिश्रीत, रसायनची गावठी हातभट्टीची दारू जळत्या चूलीवर गाळतांना ७ ड्रम मध्ये १३०० लिटर, कच्चे व गरम रसायनासह आणि गावठी हातभट्टीची ५० लिटर तयार दारू असे अंदाजे किंमत ४७ हजार रुपये किमतीचे मालासह मिळुन आला आहे तर
खंडाळा शिवारात शेताच्या बाजूला सार्वजनिक जागे जवळ ११.३० वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी रशीद रन्नु गवळी हा गुळ ,महू नवसागर मिश्रीत रसायनची गावठी हात भट्टीची दारू जळत्या चूलीवर गाळतांना १३ ड्रम मध्ये २५०० लिटर,कच्चे रसायनासह आणि गावठी हातभट्टीची ५५ लिटर तयार दारू असे अंदाजे किंमत ८६ हजार ४५० रूपयांचे मालासह मिळुन आला .
छाप्यात एकुण 20 ड्रमात 3800 लीटर रसायन व गावठी हातभट्टीची दारूसह एकूण 1लाख ३३हजार ४५० रुपये किंमतीचा माल मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध प्रोव्ही कायदा प्रमाणे आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भादवि कलम 270 , 188 अन्वये असे 2 गुन्हे दाखल करण्यात आ़ले आहे.
ही कारवाई स्वतः उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड ,पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार , सपोनी अमोल पवार, पो हे कॉ विठ्ठल फुसे,अजय माळी ,प्रवीण पाटील, रियाज काझी, प्रदीप इंगळे, संकेत झांबरे, शिवपूर कन्हाळयाचे पोलिस पाटील रेवसिंग पाटील होमगार्ड रितेश शेकोकारे , गोपाळ पवार, भूषण पवार , यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *