भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील दिपक धांडे व माजी नगरसेविका शारदा धांडे यां दांपत्यानी आपल्या ७ वर्षाचे मुलाच्या वाढिवसानिमित्त प्रभाग क्र ७ व ८ या भागतील कोविड १९ मधील खऱ्या योद्धयांचा(सफाई कर्मचारी ) यांचा सत्कार करून साजरा केला तर सफाई कर्मचाऱ्यांना मास्क, हॅंड ग्लोज, सॅनिटायझर व मिठाईचे वाटप करून सत्कार करण्यात आला.
देशामध्ये सध्या कोरॉना महामारीने थैमान घातले आहे सर्वदूर भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा युद्धजन्य आणिबाणी परिस्थिती मध्ये डॉक्टर,पोलिस, नर्स, आरोग्यसेवक ,यांच्या प्रमाणेच सफाई कर्मचारी सुध्दा आपली सेवा बजावत आहे. परंतु दु्दैवाने त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाहीं म्हणून दिपक धांडे व माजी नगरसेविका शारदा धांडे यांनी त्यांच्या मुलाच्या ७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या प्रभाग क्रमांक ७ व ८ या भागातील सर्व सफाई कर्मचारी यांचा सत्कार केला. या कार्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे .



