भुसावळ (प्रतिनिधी ) –
इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांनी द वर्ल्ड स्कूल भुसावळ येथे राखी बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. या मधील संकल्पना वेस्ट टू बेस्ट अशी होती.

यावेळी श्रीमती ज्योती राठोड यांनी सर्व मुलांना प्रशिक्षण देण्याचे कार्य केले. या प्रशिक्षणाद्वारे सुमारे 150 मुलांनी अत्यंत सुंदर राखी बनवल्या. या राख्या मुलां द्वारे आपल्या सीमेवरील लढणाऱ्या सैनिकांना पाठवल्या जाणार आहेत. या प्रशिक्षण बद्दल क्लब तर्फे सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रोजेक्टसाठी अध्यक्ष सीमा सोनार,सचिव योगिता वायकोळे,प्रोजेक्ट चेअरमन आदिती भडंग,रेवती मांडे,सुनीता पाचपांडे,हेमलता सोनार यांनी परिश्रम घेतले. वर्ल्ड स्कूल तर्फे आयोजकांचे कौतुक व सन्मान करण्यात आला या प्रसंगी सर्व स्टाफचे सहकार्य लाभले.



