जळगाव (प्रतिनिधी ) – येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कृषि विभाग, जळगाव, आत्मा जळगाव, कृषि विज्ञान केंद्र, व रोटरी क्लब ऑफ वेस्ट, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने “रानभाजी महोत्सव” चे आयोजन करण्यात आले , या महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे सह वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी भेट घेऊन ,शेतकऱ्यांकडून विविध रानभाज्यांची माहिती जाणून घेतली.

जळगाव जिल्हयात मागील ५ वर्षांपासुन रानभाजी महोत्सव चे आयोजन करण्यात येत असते. या वर्षी सुध्दा जळगाव जिल्हयातील सातपुडा पर्वत रांगेतील व जिल्हयातील इतर जंगल परिसरातील विविध प्रकारच्या रानभाज्यांचे महत्व, त्यातील जीवनसत्वे, खनिजे आणि औषधी या गुणधर्माबाबत शहरवासीयांना महत्व पटवुन देणेसाठी कृषि विभाग, जळगाव, आत्मा जळगाव, कृषि विज्ञान केंद्र, व रोटरी क्लब ऑफ वेस्ट, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने “रानभाजी महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच या महोत्सवात रानभाज्यांपासुन तयार करण्यात आलेल्या पाक कलाकृती स्पर्धेचे आयोजन सुध्दा करण्यात आले. यावेळी महराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्या आर्थिक सहकार्यातुन प्रवासी वाहन कर्ज योजना अंतर्गत लाभार्थ्यांना वाहनाचे वाटप करण्यात आले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोकजी उईके, वत्रोद्योग मंत्री .संजयजी सावकारे, आमदार.सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार .चंद्रकांत सोनवणे, आमदार .चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी श्युष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल तसेच आदिवासी विभाग अधिकारी उपस्थित होते.



