ट्राॅमा सेंटर व ग्रामीण रूग्‍णालयाने समस्‍या सुटणार-आ.संजय सावकारे

भुसावळ(प्रतिनिधी )-
गेल्‍या अनेक वर्षांपासुन नगरपरिषद रूग्‍णालयात नागरिकांना कुठल्‍याही सुविधा मिळत नसल्‍याने सततचा पाठपुरावा करुन ट्राॅमा सेंटर व ग्रामीण रूग्‍णालय मंजूर करून आणले होते.या दोन्‍ही इमारतींचे काम पुर्ण झाले असून या इमारती आरोग्‍य विभागाच्‍या ताब्‍यात दिल्‍या जाणार असल्‍याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिका-यांसोबत इमारतीची पाहणी केल्‍यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी आ.सावकारे पुढे म्‍हणाले कि,संत गाडगेबाबा रूग्‍णालयात सुविधा नसल्‍याने गोरगरीब नागरिकांना उपचारासाठी व पोलिस विभागाला आरोपींचे मेडीकल,शवविच्‍छेदन व विविध कामांसाठी जळगाव,यावल व वरणगाव येथे जावे लागत होते.ब-याचदा अनेक अपघात ग्रस्‍तांना उपचारा अभावी जीव गमवावे लागत होते. नव्‍याने तयार झालेल्‍या या दोन्‍ही रूग्‍णालयात पदे मंजूर आहेत मात्र डाॅक्‍टर व अन्‍य कर्मचा-यांची भरती अद्‍याप झालेली नाही.सद्‍ध्‍या कोरोनासाठी प्रशासनाने रेल्‍वे व आयुध निर्माणी रूग्‍णालय तसेच केंद्रीय विद्‍यालय अधिग्रहीत केल्‍या असून शासकीय मालकीच्‍या या इमारतीही आता कामात येतील.लवकरच कर्मचारी भरती झाल्‍यावर परिसरातील नागरिकांना आरोग्‍याच्‍या उत्तम सुविधा व पोलिस विभागाला त्रास कमी होणार आहे.सततचा पाठपुरावा फळाला आल्‍याचेही आ.सावकारे यांनी सांगितले.या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस.परदेशी,अभियंता एस.यु.कुरेशी आदी उपस्‍थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *