भुसावल (प्रतिनिधि )-
जळगाव जिल्हा आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ भुसावळ शाखेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाजातील गरजू कुटुंबाना लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक किराणा वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 3 मे पर्यंत लॉक डाऊन असल्यामुळे गोर, गरीब, कष्टकरी कुटुंबातील लोकांना जळगांव जिल्हा आदिवासी ठाकूर समाज मंडळातर्फे सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष गोपाळराव ठाकूर यांच्या पुढाकाराने सामूहिक वर्गणीतून मदत निधी गोळा करीत १०ते १५ दिवस पुरेल इतके किराणा सामानाचे किट तयार केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गरजू समाज बांधवांना सदरचे किराणा किट देऊन मदत करण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सोशल डिस्टसिंग पाळत गरजू कुटुंबियांना घरपोच किराणा साहित्य पुरवण्यात आले. सोबत रोजच्या स्वच्छतेसाठी व हात धुण्यासाठी साबण देण्यात आले.
यावेळी ठाकूर समाज जिल्हाध्यक्ष गोपाळराव ठाकूर, भुसावळ अध्यक्ष मुन्ना ठाकूर, दत्तू ठाकूर, बंटी ठाकूर, अशोक बूलाखी, मयूर ठाकूर, सौरभ ठाकूर, जी.आर.ठाकूर, नंदकुमार साळुंखे, राजू महाले, दत्ता ठाकूर आदींनी परीश्रम घेतले. भुसावळ ठाकूर समाजातील अनेक दात्यांनी उत्स्फूर्तपणे देणगी देत समाजातील बांधवाना मदतीचा हात देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवस खर्या अर्थाने सार्थक केला.



