भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा माजी खासदार वआमदार
हरिभाऊ जावळे यांना जिवे ठार मारण्याच्या धमकीची सखोल चौकशी व्हावी व त्या समजकंटका विरुद्ध त्वरित योग्य कारवाई व्हावी अशी मागणी येथील भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर व ग्रामिण यांनी केली असून या धमकी प्रकरणाचा तिव्र शब्दात जाहीर निषेध केला आहे.तसेच याबाबत १६ एप्रिल गुरुवार रोजी येथील बाजारपेठ पोलिस ठाणे येथे निबेदन देण्यात आले आहे . यावेळी भाजप शहर अध्यक्ष दिनेश नेमाडे , पवन बुंदेले , आदी उपस्थित होते.
भाजपा जळगाव जिल्हा अध्यक्ष हरीभाऊ जावळे यांना काल.१५ एप्रिल रोजी
८९५९०७५५९२ या क्रमांकावरून राजेंद्र आर.पवार या नावाने जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीचा भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर व ग्रामिण च्या वतीने तिव्र शब्दात जाहीर निषेध करत आहोत. धमकी देणाऱ्या व्यक्तीने जिल्ह्यातील अनेक व्यक्तींना यापूर्वी सुध्दा अशाच प्रकारे धमकीचे मेसेज पाठविलेले आहे. गेल्या महिनाभरा पासून ही व्यक्ती जाणिवपुर्वक जिल्ह्यातील महत्वाच्या व्यक्तींना मानसिक त्रास देत आहे. त्यामुळे समाज मनामध्ये नाराजीची भावना पसरत आहे. गेल्या महिनाभरा पासुन पोलिस प्रशासन या व्यक्तीचा बंदोबस्त करु शकले नाही ही बाब सुद्धा आश्चर्यकारक आहे. त्वरीत सदर व्यक्तीवर कडक कायदेशीर कार्यवाही करावी व यापुढे त्याने असे मेसेज पाठवू नये. याबाबत दक्षता घ्यावी.
जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांना दिलेल्या या धमकीचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करत आहोत. तसेच कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राहावी या करीता आम्ही आपणास सहकार्य सुध्दा करीत आहोत. मात्र पोलिस प्रशासनाने त्वरीत अशा समाज कंटक प्रवृत्तीचा योग्य बंदोबस्त करावा. अशी मागणी निवेदनाद्वारे
खा.रक्षाताई खडसे.,आ.संजय सावकारे, प्रा.डॉ.सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे,
उपनगराध्यक्ष सईदा शेख शफी, शहरध्यक्ष दिनेश नेमाडे , तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील,
पवन बुंदेले,अमोल महाजन, प्रशांत पाटील,दीलीप कोळी, .मनिषा पाटील-सभापती,
उपसभापती वंदना उन्हाळे जि.प.सदस्यपल्लवी सावकारे- जनता पार्टी नगरसेवक , पदाशिकारी ,सक्रिय कार्यकर्ता बुथ प्रमुख ,शक्तीकद्र प्रमुख , सरपंच,आदिनी मागणी केली आहे.



