भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील रेणुका माता मंदिरात दि १० जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी आठ ते नऊ वा गुरु पादुका प्राणप्रतिष्ठा शास्त्रोक्तविधी , सकाळी ९ः३० ते १० वाजता सोहम ज्ञान भक्ती साधक परिवारतर्फे सामूहिक उपासना, १०:४५ वा नामजप , ११ ते १२ वा परमपूज्य रेणुका नंदन महाराजांचे मार्गदर्शन ,त्यानंतर १२ ते २ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होईल भाविकांनी लाभ घ्यावा असे रेणुका मंदिर तर्फे मयुर जोशी यांनी कळवले आहे.



