डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या भूषण पाटीलची चौकशी करून कठोर कारवाई करावी – माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे यांची मागणी.


भुसावळ (प्रतिनिधी ) – एका व्हायरल क्लिप मध्ये भूषण पाटील या नावाच्या माथेफिरूने घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अत्यंत घृणास्पद शब्दात संतापजनक भाषा वापरली आहे.या अवमान कारक भाषेत बोलणाऱ्या पाटील ची पोलीस विभागाने चौकशी करून त्याला कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक,माजी.नगरसेवक शिवसेना यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
आपल्या पत्रकात पुढे त्यांनी म्हटले आहे की,सदरहु क्लिप मध्ये पाटील एका महिलेवर बलात्कार झाल्याचा उल्लेख करीत आहे.आणि याच घटनेतून तो राज्याचे मंत्री यांना ही शिविगाळ करीत आहे.हे बोलत असताना त्यांच्या समोर दोन तीन व्यक्ती आहेत असे स्पष्ट जाणवते.ते लोक कोण आहेत ? असे संपूर्ण गुढ प्रकरण दिसत आहे.पोलीस खात्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करावी.कारण त्याने आंबेडकरी समाजाला वेदनादायी भाषा वापरली आहे.त्यामुळे त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संतप्त भावना पसरली आहे.असेही माजीनगरसेवक सुरवाडे यांनी म्हटले आहे.