भुसावळ (प्रतिनिधी ) – सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वेगाडी रवाना होण्याच्या चार तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी, रेल्वे बोर्डाने प्रवासाच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट तयार १० जुलै २०२५ पासून प्रारंभ करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत सर्व प्रवाशांना सूचित करण्यात येते की, सर्व प्रवासी गाड्यांसाठी आठ तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू दिनांक १० जुलै २०२५ पासून अनिवार्य करण्यात येत आहे.
यासंदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:
1️⃣ गाड्यांचे प्रस्थान वेळ – ०५:०० ते १४:०० वाजेपर्यंत:
➡️ प्रथम आरक्षण चार्ट मागील दिवशी रात्री २१:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल.
2️⃣ गाड्यांचे प्रस्थान वेळ – १४:०० ते २३:५९ वाजेपर्यंत:
➡️ प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या ८ तास आधी तयार करण्यात येईल.
3️⃣ गाड्यांचे प्रस्थान वेळ – ००:०० ते ०५:०० वाजेपर्यंत:
➡️ प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या ८ तास आधी तयार करण्यात येईल.
दुसऱ्या आरक्षण चार्ट तयार करण्याच्या विद्यमान प्रावधानांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
८ तास आधी चार्टिंगचे फायदे: प्रवाशांना आपल्या प्रवासाची योजना आधीच आखणे सोपे जाईल. वर्तमान आरक्षण कोटा गाडीच्या प्रस्थानाच्या ८ तास आधी उपलब्ध असेल. प्रवाशांना त्यांच्या तिकिटाची स्थिती (कन्फर्म/वेटिंग/रद्द) लवकर समजू शकेल (काही प्रकरणांमध्ये एक दिवस आधी), त्यामुळे पुढील नियोजन करणे सुलभ होईल. फक्त कन्फर्म तिकिटधारकच प्लॅटफॉर्मवर येतील, त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होईल आणि स्वच्छता राखण्यात मदत होईल.
ही सुधारणा प्रवाशांना अंतिम क्षणी मिळणाऱ्या तिकिटांबाबत अधिक स्पष्टता व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी करण्यात आली आहे.


