भुसावळ (प्रतिनिधी )-
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या भुसावळातील प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक मुकेश पाटील तसेच नगरसेविका अनिता सतीश सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे घरातच असलेल्या गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. गेल्या 25 दिवसांपासून कामधंदा नसल्याने अनेक कुटुंबांपुढे रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने नगरसेवकांनी स्वखर्चाने प्रभागातील पाचशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
साडेपाचशे कुटुंबांना मदतीचा हात नगरसेवक मुकेश नरेंद्र पाटील व नगरसेविका अनिता सतिश सपकाळे तसेच समाजसेवक सतीश सपकाळे यांच्या सौजन्याने आतापर्यंत 350 नागरीकांना पाच किलो गव्हाचे पीठ, दोन किलो कांदे, दोन किलो तांदुळ, 200 ग्रॅम मिरची पावडर, 100 ग्रॅम हळद, एक किलो मीठ, एक किलो तेल आदी जीवनावश्यक गोष्टींचे वाटप करण्यात आले तसेच शनिवार, 18 रोजी 200 परीवारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. प्रभाग क्रमांक सातमधील जुना सतारा, कोळी वाडा, गावठाण, विठ्ठल मंदीर परीसर, हुडको कॉलनी जुनी व नविन, म्हाडा कॉलनी इतर परीसरासह भिलवाडी, मरीमाता मंदीर परीसर व ताडीचा मळा भागातील गरजूंना मदतीचा हात दिला जात आहे.



