माजी आमदार हरीभाऊ जावळे यांना मोबाईलवरून जीवे ठार मारण्याची धमकी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
भाजपाचे आमदार तथा खासदार हरीभाऊ जावळे यांना सुद्धा जळगावच्या राजेंद्र आर.पवार (व्यंकटेश नगर, हरीविठ्ठल रोड, जळगाव) या इसमाने मोबाईलवरून संदेश पाठवत 33 दिवसानंतर खून करण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यापूर्वीदेखील अनेक राजकीय लोकप्रतिनिधींना राजेंद्र पवार नामक व्यक्तीच्या मोबाईलवरून संदेश पाठवून जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याने या इसमाचा शोध घेवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
खिर्डी येथील तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील यांनादेखील जळगाव येथील राजेंद्र आर.पवार (व्यंकटेश नगर, जळगाव) या नावाने संदेश पाठवत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *