भुसावळ (प्रतिनिधी )-
श्री राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारा तर्फे पी.ऍम.केअर्स मध्ये दोन लाख आठ हजार रुपये सहायता निधि आ संजय सावकारे यांचे हस्ते सुपुर्द करण्यात आला.
कोरोना महामारी च्या सहायता निधि करीता केंद्र सरकार च्या पंतप्रधान सहायता निधी मधे श्री राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारा तर्फे दोन लाख आठ हजार चा चेक तहसीलदार दिपक ढिवरे यांना सुपुर्द करण्यात आला.
यावेळी आमदार संजय सावकारें,राधेश्याम लाहोटीं यांच्या हस्ते चेक देण्यात आला. या वेळी प्रभातफेरी सदस्य संजय अग्रवाल, गोपाल तिवारी, जी आर ठाकुर, डॉ.देवेन्द्र शर्मा, अर्जुन पटेल उपस्थित होते.
श्री राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारा तर्फे रोज सकाळी अर्धा तासाची पायी दिंडी काढण्यात येते. ही प्रभातफेरी आद्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय व स्वास्थवर्धक गतिविधि मधे नेहमी पुढाकार घेते.
सहायता निधि मधे प्रभातफेरी प्रमुख राधेश्याम लाहोटी,संजय एन.अग्रवाल,बृजमोहन अग्रवाल, प्रेमराज लढ्ढा,गोपाल तिवारी,डॉ.देवेन्द्र शर्मा,गजानन ठाकुर ,लीलाधर अग्रवाल,संतोष नागला,सुनील बी.अग्रवाल, सुनील जैन,मदन बोरकर,अर्जुन पटेल,लालजी पटेल,ईश्वर पटेल,सुनील र.अग्रवाल श्री सुन्दरकाण्ड आस्था मंडळ व श्री राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारा चे सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



