भुसावळ (प्रतिनिधी)-
तालुक्यातील जोगलखेडा या गावातील आदीवासी तथा भिल वस्ती मध्ये राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशिय फाउंडेशनतर्फे 30 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तु देऊन मदत करून मानुसकीचे दर्शन घडविले .
कोरोना विषाणू ( Covid-19 ) च्या वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता सुरु असलेल्या लॉक डाऊन मुळे बहुतांशी कष्टकरी जे दिवसा कष्ट करून संध्याकाळी परिवाराचा उदरनिर्वाह करतात अशा व्यक्तींवर विपरीत परिणाम होत आहे. याकरिता येथील राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशिय फाउंडेशनतर्फे माध्यमातून ज्यांच्या जवळ रेशनकार्ड नाही अशा जवळपास गरजवंत 30 कुटुंबांना जिवनावश्यक वस्तु 5 किलो गव्हाचे पिठ, 3 किलो तांदुळ, 1 किलो साखर, 1 किलो तुरदाळ, 1 पाव चहापत्ती, 1 किलो तेल , 1 पाकिट मिठ, 1 पाव लाल मिरची पावडर, हळद ई. जिवनावश्यक वस्तु देण्यात आले.
या वस्तुवाटपा करीता समाजातील दानशुर व्यक्तींनी संघटनेने विश्वासाने मदत केल्याबद्दल फाउंडेशनच्यावतिने आभार व्यक्त केले, तसेच जोगलखेडा येथील गरजवंत नागरिकांनी संघटनेच्या दातृत्वाला सलाम करीत आभार मानले.



