भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव रोड परिसरातील कडू प्लॉट भागातील दुकान क्रमांक १२ या दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी रद्द केला होता. प्रशासनाने या लाभार्थ्यांना त्वरित त्याच भागातील अन्य दुकानामध्ये धान्य वितरित करावे अशी मागणी शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांच्याकडे केली होती. प्रा धिरज पाटिल यांच्या मागणीला तहसील प्रशासनाने मान्यता दिली असून टेक्निकल हायस्कूल मागील श्रमिक सेवा संघ दुकान नंबर १० मध्ये ग्राहकांची तात्पुरती सुविधा करण्यात आली असल्याचे सांगीतले आहे.
वाढीव संचारबंदीत ग्राहकांना दिलासा: प्रा.धिरज पाटील
संचारबंदीचा काळ वाढल्याने नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. रेशन दुकानावर श्रीनगर, गणेश कॉलनी, जुना सातारा, भिरुड कॉलनी, कोळी वाडा, भोई नगर, हुडको कॉलनी परिसरातील उर्वरित कार्डधारकांना एप्रिल महिन्याचे धान्य नियमित दरानुसार विक्री करण्यात येणार आहे, या महिन्याचे मोफत धान्य 16 एप्रिलनंतर देण्यात येणार असून, त्यामध्ये कार्डधारकांना पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्यात येईल. धान्य वितरणाबाबत दुकानदारासोबत चर्चा झाली असून ग्राहकांना दिलासा मिळणार असल्याचे शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले.



