भुसावळात चिमुकल्या वारकऱ्यांसोबत स्वामिनी फाउंडेशनने साजरी केली वारी ;

भुसावळा (प्रतिनिधी ) – येथील स्वामींनी फाउंडेशनतर्फे मदर्स केअर प्री स्कुल भुसावळ येथे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला चिमुकल्या वारकऱ्यां सोबत श्री विठ्ठलाच्या पंढरीची वारी साजरी करण्यातआली . यानिमित्त या चिमुकल्यां बालकांनी पांढरे कुर्ते व धोतर टोपी परिधान करून टाळ मृदुग भगवा झेंडा हातात घेऊन तर मुलींनी सुंदर नऊवारी नेसून तुळशीवृंदावन डोक्यावर घेत दिंडीत सहभागी झाल्या . प्रसंगी विठ्ठल नामाचा जयघोष केला . यावेळी या लहानग्या वारकरी यांना गिफ्ट्स सह केळी , राजगिरा लाडू , बिस्किट्स , चॉकलेट आदी खाऊ वाटप करण्यात आला .

फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रियंका चौधरी, उपाध्यक्ष अनिता आंबेकर, विजया निकम, मनीषा धांडे उज्वला पाटील , रीना गायकवाड , अमृता बजाज , सचिव उज्वला बागुल, जान्हवी बागुल आदी महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या .

कार्यक्रमास मदर्स केअर नर्सरी च्या जयश्री प्रशांत चौधरी याचेसह शिक्षक वृंदाचे अनमोल सहकार्य लाभले .