ताप्ती पब्लिक स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची सैन्यात नियुक्ती ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मधील माजी विद्यार्थी संकल्प देविदास चौधरी याची वयाच्या २३ व्या वर्षी भारतीय सैन्य दलात नियुक्ती झाली. त्याबद्दल त्याचा ताप्ती पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल नीना कटलर यांनी पुजन करुण सन्मान केला.संकल्प चौधरी याने ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतरचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील डिफ्रेन्स अकॅडमी येथे केले.पुणे खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये तीन वर्ष व नंतर देहरादून येथे एक वर्ष प्रशिक्षण घेतल्यावर दि १४ जून पासून त्याची कश्मीर रायफल दलात लेफ्टनंट पदी जालंदर येथे नियुक्ती झाली.ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलेला संकल्प चौधरी याचे स्वागत शाळेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी केले.यावेळी त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

फोटो कॅप्शन – ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये संकल्प चौधरी याचा सन्मान करताना प्रिन्सिपल निना कटलर व इतर शिक्षक वर्ग.