रीवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडीच्या कालावधीत वाढ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने रीवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दर आठवड्याला धावणाऱ्या विशेष गाडीच्या सेवेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहे –

गाडी क्रमांक 02187, रीवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडी, अधिसूचित दिनांक 03.07.2025 पर्यंत आता 25.09.2025 पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 02188, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – रीवा साप्ताहिक विशेष गाडी, अधिसूचित दिनांक 04.07.2025 पर्यंत आता 26.09.2025 पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

वरील विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.