भुसावळात विधीसेवा समितीच्यावतीने भिलवस्तीवर माहिती पत्रक वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – कायद्याबाबत सर्व सामान्यांना माहिती असावी त्यांना सुद्धा मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने विधी सेवा समितीच्या वतीने व अँड जास्वंदी भंडारी यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक२३ रोजी येथील तापी नदी वरील भिल वस्ती येथील महिला ,लहानमुले ,व नागरिकांना बालकामगर कायदा व बालशिक्षण कायद्याची सविस्तर माहिती PLV सौ स्वाती भोळे व PLVसौ रुपाली नेवे यांनी देऊन कायदेविषयक अडचणी असल्यास विधी सेवा समितीकडे संपर्क कसा करावा याबद्दल माहिती दिली प्रसंगी कायदेविषयक माहिती पत्रक देखील वाटप केले .

संध्याकाळची वेळ असल्यामुळे सर्व वस्तीवरील मोठ्या संख्येने नागरिक हजर होती दरम्यान बालशिक्षण कायदाची माहिती देतांना PLV रुपाली नेव व PLV सौ स्वाती भोळे तसेच माहिती पत्रक पण वाट प केले साधार 50 ते60 पालकांची हजेरी होती